मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम; घरोघरी सर्वेक्षणाला १७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ;**** **अंतिम मतदार यादी २७ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार

Date: 2026-08-04
news-banner
नवयुग पालघर
****मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम; घरोघरी सर्वेक्षणाला 
१७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ;****
**अंतिम मतदार यादी २७ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार**

मुंबई | प्रतिनिधी
भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision - SIR) कार्यक्रमाच्या वेळापत्रकात बदल केला आहे. सुधारित कार्यक्रमानुसार बूथस्तरीय अधिकारी (BLO) यांचे घरोघरी जाऊन पडताळणी करण्याचे काम
१७ ऑगस्ट २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे.

सुधारित वेळापत्रकानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्यामार्फत घरभेटी ३० जून ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत होतील. त्यानंतर १७ ऑगस्ट रोजी मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण अथवा पुनर्रचना केली जाईल.
२४ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत मतदारांना दावे व हरकती दाखल करता येतील.

दावे व हरकतींवरील सुनावणी आणि त्यांचा निपटारा २४ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत करण्यात येईल. त्यानंतर २७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. 

निवडणूक आयोगाने सुधारित कार्यक्रमाची माहिती सर्व संबंधित अधिकारी आणि राजकीय पक्षांना देण्याचे तसेच त्याची व्यापक प्रसिद्धी करण्याचे निर्देश दिले आहेत. 

Leave Your Comments